-2.4 C
New York
Monday, December 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

युवा मराठा प्रीमियर लीगला सुरुवात स्पर्धेच्या उत्पन्नातून गरजूंना मदतीचा हात 

 

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : युवा खेळाडूंना संधी मिळावी आणि समाजकार्यात योगदान द्यावे, या उद्देशाने आयोजित युवा मराठा प्रीमियर लीग (वायएमपीएल) क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (दि.३) पार पडले. शहरातील एमजीएमच्या मैदानावार चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन राजेश मोरे व श्रीकांत दिसले यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चार रोमांचक सामने खेळवले गेले. या सामन्यांमध्ये वीर छावा ११, शंकर पार्वती ११, नंदनी टायटन्स आणि देवराज ११ या संघानी विजय मिळवला. या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत बापू वरकड, सुनील डावकर, गजानन भानूसे आणि नवनाथ वरकड सामनावीर ठरले. दरम्यान आयोजकांनी एक सामाजिक उपक्रमही राबवण्याचा संकल्प केला. या स्पर्धेतून मिळणारे सर्व उत्पन्न गरजूंसाठी वापरण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संयोजक, कार्यकर्ते आणि खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले. आगामी दिवसांत होणाऱ्या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या