छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य भास्कर गाडेकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह सोमवारी 28 एप्रिल मुंबईत खा.संदिपान भुमरे, आ.विलास भुमरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून गाडेकर जुलै 2013 पर्यंत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेत 8 सदस्य तथा अर्थ व बांधकाव आणि आरोग्य व शिक्षण अशी दोन सभापतीपदे मनसेला मिळाली. याशिवाय महापालिकेत एक नगरसेवक आणि पंचायत समितीचे 12 सदस्य होते. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात होत्या. कन्नड विधानसभा मतदारसंघातून मराठवाड्यातील एकमेव आमदार म्हणून हर्षवर्धन जाधव यांचा विजय झाला होता. मध्यंतरी पक्षांतील अंतर्गत कुरबुरीला कंटाळून गाडेकर पक्षकार्यापासून अलिप्त होते. सोमवारी त्यांनी गाड्यांच्या मोठ्या ताफ्यासह शक्तीप्रदर्शन करीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने मनसेला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
——
या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
य प्रवेशामध्ये शिवाजी कोंडके, संतोष देवरे, शिवनाथ गाडेकर, भास्कर गायकवाड, पंढरीनाथ जयवंत, वाघोळा, आजीनाथ शिंदे, बाबासाहेब काळे, बाबासाहेब लहाने, काकाजी गाडेकर, ज्ञानेश्वर लहाने कृष्णा लहाने सुखदेव काटकर, कैलास भोसले, कृष्णा सोनवणे,भानुदास गाडेकर, विशाल गाडेकर, दीपक पुरी, दिलीप गाडेकर, रुस्तुम गाडेकर, अभिजित गाडेकर, नितीन गाडेकर, रणजीत राठोड, सोनाजी गाडेकर, रवी अंभोरे आदी पदाधकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
—–
राज ठाकरे यांचा कायम आदर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षात जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. मध्यंतरी मुंबईच्या काही पदाधिकाऱ्यांची कार्यपध्दती पटत नव्हती. त्यामुळे काही काळ अलिप्त राहून परिस्थिती सुधारण्याची वाट पाहिली मात्र त्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्ो विचार तळागळापर्यंत धेवून जाण्याठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेला सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी सन्मानीय राज साहेब ठाकरे यांचा कायम आदर असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनला यश मिळेल असे कार्य आपले असणार आहे.
-भास्कर पाटील गाडेकर, शिवसेना शिंदेगट