-3.5 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

छत्रपती संभाजीनगर – सध्या सर्वत्र चर्चेत असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केवळ करमणुकीपुरता मर्यादित न राहाता, हा चित्रपट विनोदी शैलीतून समाजाला महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करणारा आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर पाहूनच कळते, की सोशल मीडियाशी संबंधित एक वेगळीच कथा इथे उलगडणार आहे. सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेल्या तीन मित्रांच्या गंमतीशीर आणि हास्यपूर्ण प्रवासाची कथा सांगणारा हा चित्रपट केवळ प्रेक्षकांना हसवणारच नाही तर विचार करायलाही भाग पडणारा आहे. पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत आणि राहुल मगदूम यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सजवलेला हा मल्टीस्टारर चित्रपट खुमासदार संवाद, हलक्याफुलकी मांडणी आणि अचूक विनोदबुद्धी यामुळे प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करणार यात शंका नाही.
कथा आणि पटकथेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीच्या जीवनशैलीतील गुंतागुंत, सामाजिक जबाबदाऱ्या आणि पारंपरिक मूल्यांचा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. विनोदाच्या आडून गंभीर विषय हाताळताना, प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा आणि विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक सशक्त संदेश देणारा आहे.
दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, “हसत-खेळत प्रेक्षकांच्या मनात सकारात्मक विचारांचं बीज रोवणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक पात्राची कहाणी काही ना काही शिकवून जाते आणि त्यांच्यामधून समाजाचं वास्तवही हलक्याफुलक्या पद्धतीनं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”
निर्माते प्रफुल्ल काकाणी म्हणतात, “ ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामुळे होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकतो. विनोदी शैलीत मांडलेली ही कथा, प्रेक्षकांना हसवत हसवत एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देते.”
हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या