हिवरा संगम/प्रतिनिधी
आज हिवरा संगम येथे ‘जीनियस किड्स इंटरनॅशनल प्री-प्रायमरी स्कूल’चा उद्घाटन समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक साईनाथ महाराज वसमतकर होते, तर अध्यक्षस्थानी हिवरा गावच्या सरपंच सौ. मेघाताई बोरुळकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद कदम पाटील सर, राजू धोतरकर सर, अशोक कदम सर, रवी कदम सर, अकबानी सर, साहेबराव पाटील सर, रवींद्र भारती सर, बालाजी गाडे सर, मुकुंद पांडे सर, जवाहरलाल जयस्वाल सर, एस.एस. पाटील सर, महेश सर, भगवान फाळके सर, पंडित कदम सर (पत्रकार) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष भाग्यवानजी भवरे सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आपल्या भाषणात ‘गावात दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्तराची शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प जीनियस किड्स स्कूलच्या माध्यमातून पूर्ण होत आहे’, असे सांगितले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुकुंद पांडे सर यांनी आपल्या भाषणात लहान मुलांच्या शिक्षणात सुसंस्कार व मूल्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. रवींद्र भारती सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सरपंच सौ. मेघाताई बोरुळकर यांनी गावात उभ्या राहिलेल्या अशा दर्जेदार शाळेचे स्वागत करत पालकांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपमुख्याध्यापक आहेफाज शेख सर यांनी तर आभार प्रदर्शन वैभव मुराणकर सर यांनी केले.
कार्यक्रमाला गावातील नागरिक, पालक, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीनियस किड्स इंटरनॅशनल शाळेच्या माध्यमातून हिवरा संगम परिसरातील शिक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.