कृषी दिनानिमित्त उपक्रम : जि. प. सीईओ अंकित यांची प्रमुख उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालाच्या वतीने मंगळवारी (दि.१) महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून परसोडा गावात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षातील (सातवे सत्र) विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन प्राचार्य प्रा. एस. एस. बैनाडे, कार्यक्रम अधिकारी एस. बी. बडे व प्रा. ए. आर. पगार यांनी केले. यावेळी पर्यावरण रक्षण आणि वनसंवर्धनाची जनजागृती करत विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली.
विशेषतः कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी शिल्पा फुले, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण विणेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम चिकटे, वनरक्षक अधिकारी भगत, वन क्षेत्रपाल भिसे , ग्रामपंचायत अधिकारी काळवणे, सरपंच साहेबराव बारसे, उपसरपंच राजूभाऊ छानवाल आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाला परसोडा ग्रामस्थांनीही मोठा प्रतिसाद दिला. प्रणव चव्हाण, वैभव कवडे, अतुल राजपूत, प्रसाद गायकवाड, चैतन्य घोडके, विनोद आवारे, प्रवेश बोहरा, आशिष बनकर, अक्षय गव्हाळे, आदित्य कोतकर या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. सीईओ अंकित यांनी कार्यक्रमाचे व मार्गदर्शक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी ठरला.