स्व. तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालयात नागपंचमी सण उत्साहात साजरा
धुळे, मोराणे | २९ जुलै २०२५ (मंगळवार)
सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ, संभाजीनगर संचलित स्व. तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय, मोराणे (ता. व जि. धुळे) येथे श्रावण महिन्यातील पहिला सण – नागपंचमी आज शाळेत पारंपरिक उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव साळुंके (पाटील) साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्वप्रथम मुख्याध्यापिका इंगळे मॅडम यांनी विधिवत नागदेवाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यानंतर कलाशिक्षिका रूपाली चव्हाण मॅडम, काकड मॅडम आणि पाटील मॅडम यांनीही भक्तिभावाने पूजा अर्पण केली. विशेष शिक्षिका काकड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना नागपंचमीचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संदेश समजावून सांगितला.
विद्यार्थ्यांनी यानंतर समूह नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत सणाच्या अनुभवांची मांडणी केली. सूत्रसंचालन श्री. गजेंद्र कानडे सरांनी केले, तर आभार प्रदर्शन विशेष शिक्षक श्री. शुभम सरांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने एकजुटीने मेहनत घेतली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीवा, सामूहिक सहभाग आणि धार्मिक परंपरांचे महत्त्व रुजवले जात असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
शाळेतील अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे भावनिक व सामाजिक विकास अधिक सक्षम होत असल्याचा अनुभवही उपस्थितांनी मांडला.