तुतारीवाल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
माजलगाव -रविकांत उघडे
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत सौ.महरीन शिफा चाऊस यांना मोठे बळ देण्यासाठी मोहन जगताप यांच्या सौभाग्यवती शिवकन्याताई जगताप स्वतः मतदारांच्या भेटी घेत आहेत. शहरातील प्रभागातील दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधत तुतारीवाल्या उमेदवारांना एकदिलाने समर्थन देण्याचे आवाहन केले.![]()
माजलगाव नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्याकडे सरकत आहे.आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मोहन जगताप यांच्या सौभाग्यवती यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे.चाऊस यांचे शहरासाठी विकासात्मक धोरण. शहराच्या प्रगतीसाठी त्यांची तळमळ त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शिफा चाऊस
यांचे काम,त्यांची संवेदनशीलता यांचा उल्लेख त्या मतदारांत करत आगामी नगरपरिषदेसाठी सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित करत आहेत.शिफा बिलाल चाऊस यांची नगर अध्यक्षपदाची उमेदवारी सक्षम असून सर्वची सर्व शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे उमेदवार सक्षम असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान नागरिकांनीही त्यांच्या या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सौ.जगताप यांनी जनतेसमोर एकता,विकास आणि पारदर्शक प्रशासनाचे चित्र उभे केले आहे.