माजलगाव -रविकांत उघडे
एकत्र लोकसभा एकत्र विधानसभा एकत्र सत्तेत आहेत.आता नगरपरिषद निवडणुकीच्या रंगमंचावर भांडण दाखवायचं आणि मागे एकत्र बसून समीकरणं ठरवायची.हीच दोन्ही चिन्हांची पद्धत झाली आहे.कमळ आणि घड्याळ यांची मिलीभगत स्पष्ट असून’गंगाधर ही शक्तिमान आहे’
या अर्थाने मोहन जगताप,नारायण डक यांनी घड्याळ आणि कमळ वाल्यांचा समाचार घेतला.तर ‘आहेच मी सौ करोडचा एक अरब.
परंतु तुझे धंदे चोरटे आहेत असे
असे उत्तर सहाल चाऊस यांनी खालील पटेल यांचे नाव घेता दिले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या
निवडणूक प्रचारार्थ प्रभाग ७ आणि प्रभाग ९ मधील कॉर्नर सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विश्वंभर थावरे,कचरू खळगे,शायद मणियार,मुजम्मिल पटेल,संतोष यादव,बिलाल चाऊस,उमेदवार नारायण होके,महमूद कुरेशी रामराजे रांजवण यांची उपस्थिती होती.
माजलगाव नगरपरिषद निवडणुकीच्या राजकीय वातावरणात आज जगताप आणि डक यांनी केलेल्या थेट आरोपामुळे खळबळ उडाली आहे.गंगाधर ही शक्तिमान आहे!या प्रसिद्ध वाक्याचा राजकीय अर्थ लावत त्यांनी कमळ आणि घड्याळ पक्षांवर सरळसरळ संगनमताचा ठपका ठेवला.गाडीचा बोर्ड बदलला म्हणून गाडी बदलत नाही. राज्याच्या सत्तेत एकच असणाऱ्या समोरच्या पक्ष्याची निवडणुकीतील कावेबाजी आपण ओळखावी असे आवाहान यावेळी जगताप यांनी केले.तर दहा वर्षात तुमच्याकडे सत्ता होती आतापर्यंत तुम्ही विकास नाही केला मग आता काय करणार?असा प्रश्न त्यांनी आमदार सोळंके यांना विचारून त्यांनी सहालभैयाला निवडून द्या असे आवाहन यावेळी केले.डक यांनीही घड्याळ आणि कमळ यांचा समाचार घेत सडेतोड हल्ला केला जनतेसमोर वाद,तंटे,आरोप दाखवून मतं खेचायची आणि नंतर टेबलाखाली हातमिळवणी करायची हे शहराची दिशाभूल करणारे राजकारण आहे.दोन्हींचा खेळ लोकांच्या नजरेतून सुटणार नाही.दरम्यान नगराध्यक्ष पदाचे प्रतिनिधी असणारे सहाल चाऊस यांनी त्यांच्या होम पिचवर मागच्या सभेत राष्ट्रवादी घड्याळच्या नेत्यांकडून झालेल्या आरोपांवर आक्रमकपणे प्रति हल्ला केला.यावेळी ते म्हणाले समोरचा उमेदवार फक्त पार्ट्या खाणारा उमेदवार आहे.आज याची पार्टी उद्या त्याची पार्टी याच धंद्यात तो मशबगुर आहे.मी सतत जनतेत राहतो त्यामुळे जनता मला सतत निवडून देते. वयाच्या 18 व्या वर्षापासून मी लोकांची कामे करीत आलो आहे. लोक माझी इज्जत करतात करतात मी कोणावर दादागिरी करत नाही. आहेच मी सौ करोड एक अरब.परंतु तुझे धंदे चोरटे आहेत.असा घनघातीही त्यांनी खलील पटेल यांचे नाव न घेता केला.तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माझ्या सुनेकडील ओबीसी सर्टिफिकेट शासनाने सर्टिफाइड केले आहे.असंही ते यावेळी म्हणाले.तर आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर घनाघात करताना ते म्हणाले आमदाराने तालुक्यात साडेतीनशे लोकांना जेलमध्ये घालण्याचे उद्योग केले आहेत.काळ सर्वांचाच येत असतो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.आमदाराच्या जीवावर बेतणाऱ्या जाळ पोळीचा प्रकरणात स्वतःला अडचणीत टाकून मी केलेले सहकार्य आमदार विसरले आहेत याची आठवणी चाऊस यांनी आ.सोळंके यांना करून दिली.तर तोफिक पटेल यांचे नाव न घेता त्यांना नायदर अशी उपमा त्यांनी यावेळी दिली.यावेळी उपस्थित कॉर्नर बैठकीला सभेचे स्वरूप आले होते.दरम्यान तरुणांमध्ये जल्लोशात घोषणाबाजी सुरू होत्या.