चाऊस म्हणजे शहराच्या विकासासाठी जागृत राहणारा माणूस-मोहन जगताप.
तुतारीचा नगराध्यक्ष म्हणजे आपणच!सहालभैया चाऊस.
माजलगाव -रविकांत उघडे
माजलगाव नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात आहे.समोर पैशाचा बाजार मांडला आहे.त्यांचे पैसे घ्या.ते पैसे आपलेच त्यांनी लुटलेले आहेत.परंतु जागरूकपणे माजलगावची नगरपरिषद शहराचं वाटोळ करण्याच्या हातात जाऊ देऊ नका असे असे आवाहन बाबुराव पोटभरे यांनी केले.तर सहाल चाऊस शहराच्या विकासासाठी सतत जागरुक असणारा माणूस असल्याचे प्रतिपादन मोहन जगताप यांनी केले.दरम्यान तुतारीचा नगराध्यक्ष म्हणजे तुम्ही स्वतःच आहात. त्यामुळे तुतारीलाच मतदान करा अशी कळकळीची विनंती सहाल चाऊस यांनी केली.
शहरातील प्रभाग दहाच्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर नारायण डक, विश्वंभर थावरे,इरफान मिर्झा अविनाश गोंडे,ईश्वर होके,गणेश रांजवण,फिरोज इनामदार, भालचंद्र सोळंके,इत्यादी उपस्थित होती.नगरसेवक पदाचे उमेदवार
इमरान आगा खान,गोविंद ईतापे
यांची उपस्थिती होती.
यावेळी सभेला मार्गदर्शन करताना
बाबुराव पोटभरे म्हणाले, सहालभैया चाऊस हे सर्वधर्मीय समाजात एकरूप होऊन वावरणारे,सर्वांना विश्वासात घेणारे आणि आपुलकीने जोडणारे व्यक्तिमत्त्व आहेत.चारित्र संपन्न असणारं हे व्यक्तिमत्व सतत 24 तास लोकांच्या सुखदुःखात वावरत आहे.अशा व्यक्तीला नगराध्यक्ष करा.समोर चुकीच्या हातात नगरपरिषद देऊ नका असे आवाहानही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान समोरून ईडीच्या धमक्या येत आहेत.परंतु ईडीच्या धमक्यांना घाबरणारे आम्ही नाहीत.ईडीला बिडी समजून तोडणारे आहोत आम्ही.आम्हाला घाबरायच्या भानगडीत पडू नका असं आ. प्रकाश सोळंके यांचे नाव न घेता पोटभरे यांनी त्यांना सुनावल.तर
चाऊसला एकटं सोडणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देत मोहन जगताप यांनीही स्पष्ट केले,चाऊस म्हणजे शहराच्या विकासासाठी सदैव जागृत राहणारा आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवणारा माणूस.
रस्ते,पाणी,स्वच्छता,शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विकासकामांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नेतृत्वाची आज शहराला गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान नगराध्यक्ष उमेदवाराचे प्रतिनिधी चाऊस यांनी
तुतारीचा नगराध्यक्ष म्हणजे आपण स्वतः नगराध्यक्ष आहात,असे म्हणत त्यांनी नागरिकांना सत्तेचा खरा हक्कदार म्हणून पुढे आणण्याचा संदेश दिला. लोकशाहीतील नागरिकप्रधान नेतृत्वाचा अनोखा मंत्र चाऊस यांनी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.तिन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सहालभैया चाऊस यांची जनतेत प्रतिमा आणखी ठळक झाली असून शहराच्या राजकारणात ‘तुतारी’ची हवा अजून जोम धरताना दिसत आहे.
दरम्यान नगरसेवक पदाचे उमेदवार इमरान आगाखान व गोविंद ईतापे यांनी तरुणांच्या भावनेला हात घालत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रभाग 10 मध्ये नागरिकांच्या गर्दीमुळे तुतारीचे वातावरण जल्लोषमय दिसत होते.