-2.4 C
New York
Monday, December 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दया काही कमी पडू देणार नाही-अजित पवार

राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दया काही कमी पडू देणार नाही-अजित पवार

माजलगाव -रविकांत उघडे 

माजलगाव नगरपरिषद राष्ट्रवादीच्या हातात दया आम्ही सत्तेत आहोत काही कमी पडू देणार नाही असे अभिवचन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजलगाव येथे झालेल्या सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नवाब मलिक, आ प्रकाश सोळंके, जयसिंग सोळंके, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अत्तार मेरूनबी पटेल, पती खलील पटेल,डॉ वसीम मनसबदार, माजी नगरध्यकक्ष नासेर खान पठाण,दयानंद स्वामी, जयदत्त नरवडे,डॉ उद्धव नाईकनवरे, राजेश घोडे, भास्कर शिंदे व सर्व उमेदवार उपस्थित होते.

महिलांना 33% आरक्षण, लाडकी बहीण योजना राष्ट्रवादी ने दिल्याचे सांगितले

माजलगाव शहरात अनधिकृत बांधकाम वाढली गेली त्याचा बंदोबस्त करून पर्याय देण्याचा विचार करू म्हणून सांगितले.

सांस्कृतिक दर्जा राखण्यासाठी नाट्यगृह 6 कोटी दिले,उद्याणासाठी 1 कोटी दिले असल्याचे म्हणाले.

यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी मुसलमानांना न्याय देणारे नेतृत्व अजित पवार असून आम्ही जरी भाजप सोबत आमची राजकीय तडजोड केली असली तरी पण धर्म निरपेक्ष तत्वात तडजोड नाही केली म्हणत मुस्लिमांना चुचकरण्याचा प्रयत्न केला.

सूत्रसंचालन नाना नाटकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्जुन नाईकनवरे मनोज फरके यांनी प्रयत्न केले.

 

वांझोटे भाषण

फडणवीस सरकारने मुस्लिमांसाठी केलेल्या योजनाचा पाढा अजित पवारानी वाचला. या योजना सांगत असताना ते न प च्या प्रचाराला आले कि विधानसभेच्या प्रचाराला हेच शेवट्पर्यंत कळाले नाही.

त्यांनी सहाल चाऊस यांचेसोबतचे सबंध जपल्याची चर्चा सभा स्थळी होती.

 

16 महिन्याची जेल 9 महिन्यावर भारी

16 महिने जेल मध्ये असणारे नवाब मलिक व्यासपीठावर असल्यामुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिनिधी खलील पटेल 9 महिन्याच्या जेलवर बोलताना जोर देत होते मात्र नवाब मलिक व अजित पवारानी या मुद्द्याला बगल दिली.

 

Related Articles

ताज्या बातम्या