-3.5 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

FIDE वर्ल्ड कप 2025 गोव्यात संपन्न गोवा क्रीडा हब बनण्यासाठी सज्ज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

FIDE वर्ल्ड कप 2025 गोव्यात संपन्न

गोवा क्रीडा हब बनण्यासाठी सज्ज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी,: जगातील सर्वात प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक असलेल्या FIDE वर्ल्ड कप 2025 चा समारोप आज संध्याकाळी गोव्यातील भव्य कार्यक्रमाने झाला. जोवोखीर सिंदारोव यांनी वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले, तर यी वेई यांनी रौप्य पदक आणि अंद्रेई एसीपेंको यांनी कांस्य पदक मिळवले. समारोप समारंभात उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा सिंदारोव यांना दिलेला अभिनंदन संदेशही प्रसारित करण्यात आला.

समारोप समारंभाने स्पर्धेची भव्यता आणि ऊर्जा अधोरेखित केली. या स्पर्धेत जगभरातील अव्वल बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता, तसेच भारतीय खेळाडूंनीही उल्लेखनीय व दमदार कामगिरी केली. स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक उपक्रम जसे की अनाथालय भेटी आणि चॅरिटी उपक्रम यांच्याद्वारे स्पर्धेला मानवतावादी स्पर्शही मिळाला.

समारंभात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले,
गोवा आता क्रीडा क्षेत्रात मोठी भूमिका पार पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. राज्यात सशक्त क्रीडा संस्कृती घडवण्यासाठी आम्ही स्पष्ट दृष्टीकोनातून काम करत आहोत. आमचे ध्येय बुद्धिबळ प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक शाळेत पोहोचवून तरुणांना प्रगतीची आणि उत्कृष्टतेची संधी उपलब्ध करून देणे आहे.”

डॉ. सावंत यांनी जोवोखीर सिंदारोव यांच्या विजेतेपदाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या सातत्यपूर्ण आणि कौतुकास्पद प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. तसेच पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशाचाही त्यांनी उल्लेख केला, ज्यात भारताची जागतिक बुद्धिबळातील वाढती उपस्थिती अधोरेखित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचा समारोप सर्व मान्यवरांचे आभार मानून झाला. या समारोप सोहळ्याला बुद्धिबळ दिग्गज विश्वनाथन आनंद, नितीन नारंग, लुकास एल., क्रीडा सचिव संतोष सुखदेवे, क्रीडा संचालक अजय गवडे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने गोव्यातील FIDE वर्ल्ड कप 2025 चा समारोप अधिक संस्मरणीय ठरला.

Related Articles

ताज्या बातम्या